News

भूकंपानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून 216 कैदी फरार

भूकंपानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून 216 कैदी फरार

पाकिस्तान मध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर निर्माण झालेल्या दहशतीचा फायदा घेत एका तुरुंगातून जवळपास 216 कैदी फरार झाले. फरार कैद्यांपैकी जवळपास 80 कैद्यांना पुन्हा पकडण्यात आले असून उर्वरित कैद्यांना पकडण्यासाठी व्यापक शोध अभियान राबवले जात आहे.

भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान कराचीच्या मलीन तुरुंगात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भूकंपाच्या धक्क्यामुळे खबरदारी म्हणून जवळपास 600 कैद्यांना मोकळ्या जागेत आणण्यात आले होते. मात्र दहशतीचा फायदा उचलत काही कैद्यांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. या संघर्षात एका कैद्याचा मृत्यू झाला तर निमलष्करी फ्रंटिअरचे तीन जवान व एक कर्मचारी जखमी झाला.

या गोंधळादरम्यान जवळपास 216 कैदी फरार झाल्याची माहिती तुरुंग अधीक्षक अर्शद शाह यांनी दिली. यानंतर तातडीने कारवाई करत 80 कैद्यांना पकडण्यात आले. तर 136 कैदी अजूनही फरार असून त्यांना पकडण्यासाठी शोध अभियान सुरू केल्याचे शाह यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button