भरघोस नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोराने 28 लाखांना घातला गंडा
भरघोस नफ्याचे आमिष दाखवून २८ लाखांना घातला गंडा

एका कंपनीची वस्तू विक्री केल्यास त्यावर भरघोस नफा देऊ, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल २८ लाख रुपयांनी ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अमरावती सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
एका कंपनीतील वस्तू विक्रीचे उद्दीष्ट पूर्ण केल्यास त्यावर मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष तक्रारकर्त्याला देण्यात आले. त्यानुसार तक्रारकर्त्याने गत एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान वस्तूविक्रीचे आव्हान स्वीकारले; मात्र त्या व्यवहारात आरोपीनेच तक्रारकर्त्या कडून टप्याटप्प्याने 28 लाख 990 रूपये उकळले.
तक्रारकर्त्याने ही रक्कम आरोपीच्या वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केली. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे त्याच्या निदर्शनात आले. त्यामुळे शनिवारी त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.