उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलवारी करणार नितेश राणे यांचे वक्तव्य
उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलवारी करणार नितेश राणे यांचे वक्तव्य

दिनो मोरया प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असून या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो, अशी माहिती त्या केसमध्ये आहे, असा सनसनाटी आरोप राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला.
मंत्री राणे यांनी तुळजापूर येथे शनिवारी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाबाबतीत बोलताना राणे म्हणाले, हे देवाभाऊंचे सरकार आहे. वेळ द्या. येथे ड्रग्ज, अमली पदार्थवाल्यांची मस्ती चालू देणार नाही. भविष्यात अमली पदार्थांबाबतीत विचार करायला देखील अशी मंडळी कापतील.
दोन भाऊ एकत्र आले तर चांगलेच आहे. आम्ही 132 एक भाऊ 20, दुसरा भाऊ 0 याची तुलना कशी होणार? असा सवाल करत अप्रत्यक्षपणे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंदुत्वाचा ठाकरे ब्रँड या लोकांनी हिंदुत्व सोडल्याने हे पार रसातळाला गेले, असे ते म्हणाले.
तुमची नावे हिंदू देवदेवतांशी जोडली जात आहेत, असा प्रश्न केला असता याचा मला अभिमान असल्याचे सांगून मोहमद जिना, औरंगजेबाशी तर माझे नावे जोडले नाही ना, असे ते म्हणाले. मुंबईत मराठी माणसाच्या हितासाठीठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहेत का? असा प्रश्न विचारताच राणे यांनी मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत काय ? असा सवाल पत्रकारांना केला. राहुल गांधी यांच्या लेखाबाबतीत विचारणा केली असता तो त्यांनी लिहिला नाही. दुसऱ्यांनीच लिहून दिल्याचा आरोप केला.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनावर प्रश्न विचारला असता माझ्या वाचनात तसे काय आले नाही. मला याची काही माहिती नाही, असे म्हणत या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. तुळजा भवानी देवीच्या दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी मंत्री राणे यांचा सत्कार केला.






