मित्रांना पार्टी देण्यासाठी नोकराने मालकाच्या घरातून 15 लाखांची केली चोरी
मित्रांना पार्टी देण्यासाठी नोकराने मालकाच्या घरातून 15 लाखांची केली चोरी

मित्रांना ओली पार्टी देण्यासाठी पैसे नसल्याने एका स्वयंपाक्याने आपल्या मालकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 15 लाखांच्या मुद्देमालासह दिल्लीत पळून गेलेल्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. छोटे मुखिया (32) असे अटक स्वयंपाक्याचे नाव आहे. तो विविध ठिकाणी स्वयंपाकी म्हणून काम करत होता.
मागील महिन्यात तो मालाड पूर्व येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरात स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मुखियाकडे त्याचे मित्र पार्टीची मागणी करत होते. मात्र, पैसे नसल्याने पार्टी द्यायची कशी? असा प्रश्न मुखियाला पडला होता. अखेर त्याने तो काम करत असलेल्या मालाडच्या व्यावसायिकाच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने व्यावसायिक कुटंबासह अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी गेल्याची संधी साधून 15 लाखांचा मुद्देमाल चोरून दिल्लीला पळून गेला. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला दिल्ली येथून मुद्देमालासह अटक केली.



