
मुलाचीच बाजू घेत असल्याच्या रागातून 62 वर्षीय व्यक्तीने गोळी झाडून पत्नीची हत्या केली. त्यानंतर, स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी वरळीमध्ये घडली. राजमनोहर नामपिल्ले असे मृत आरोपीचे नाव आहे.
वरळीतील सिद्धार्थ नगर परिसरात असलेल्या पंकज मेन्शन सोसायटीमध्ये नामपिल्ले हा पत्नी लता आणि 32 वर्षीय मुलासोबत राहात होता. कतार देशात कामाला असलेला नामपिल्ले हा नुकताच वरळीतील घरी परतला होता. विवाहानंतर मुलाने वेगळे रहावे असे त्याला वाटायचे. पण, मुलगा आपल्यासोबतच असावा असा त्याच्या लता यांनी हट्ट धरला. यावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले. घरात काही गोष्टींवरुन नामपिल्ले आणि त्यांच्या मुलाचे वाद झाले तर, लता या मुलाचीच बाजू घेत होत्या. त्यामुळे, नामपिल्ले हा आणखी संतापला होता.नामपिल्लेने शनिवारी रात्री पत्नीवर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून भाचा उठला. धूर बघून त्याने काय झाले, असे विचारले असता शॉर्टसक्रीटमुळे धूर झाल्याचे नामपिल्लेने सांगितले.
विक्रेत्याला दिसला मृतदेह
भाचा झोपल्यानंतर नामपिल्ले घरातूर बाहेर निघला. काही वेळ तो इमारतीच्या जिन्यात बसून होता. त्यानंतर त्याने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. पहाटेच्या वेळी एक विक्रेता इमारतीत आला असता त्याला नामपिल्ले रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडलेला दिसला. घाबरलेल्या विक्रेत्याने आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशांना याबाबत समजले






