पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी केला एन्काऊंटर
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी केला इन्काउंटर

सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पुण्यातील गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय 23 या सराईत गुंडाचे पुणे पोलिसांनी एन्काऊंटर केले. शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत काही दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते तो लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत पुणे पोलिसांनी त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एन्काऊंटर ची बातमी त्याच्या नातेवाईकांना माहिती झाल्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी आक्रोश केलाशाहरुख शेख याचा एन्काऊंटर केल्यानंतर पुणे शहर पोलिसांवर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले त्याच्या पत्नीने आरोप केला की लांबोटी जवळील चंदननगर येथे चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आला आणि शाहरुख शेख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता गोळीबार केल्याचा पत्नीने आरोप केला आहे शाहरुख शेखचे वडील रहिम शेख यांनी पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहेसदर पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे




