जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी जाहीर; भारत या नंबरवर आहे..

IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी 2025 मधील सर्वाधिक श्रीमंत देशांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या संघटनेनुसार जगातील सर्वाधिक टॉप 10 श्रीमंत देश कोणते आहेत. आणि आपल्या भारताचा यामध्ये कितवा नंबर लागतो याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आपला देश जलद गतीने विकसित होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान आज आपण जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांची यादी पाहणार आहोत. खरंतर, जगातील देशांची श्रीमंती मोजण्यासाठी अनेक निकष वापरले जात आहेत. मात्र यातील सर्वात विश्वासार्ह मापदंड आहे प्रति capita सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP per capita). जे की Purchasing Power Parity (PPP) नुसार अड्जस्ट केले जाते. जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे स्थानिक खरेदी शक्ती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती विचारात घेऊन हे मापदंड देशाच्या आर्थिक उत्पादनाचे आणि तेथील नागरिकांच्या राहणीमानाचे मूल्यांकन करत असते. दरम्यान आज आपण IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार 2025 मधील जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी जाणून घेणार आहोत. ही यादी जीडीपी पर कॅपिटावर आधारित आहे.
जगातील टॉप 10 श्रीमंत देश
1) लक्झेंबर्ग
2) सिंगापूर
3) मकाओ
4) आयर्लंड
5) कतार
6) नॉर्वे
7) संयुक्त अरब अमिराती
8) सॅन मारिनो
9) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
10) स्वित्झर्लंड
भारताचा नंबर कितवा आहे माहित आहे का ?
2025 मध्ये भारताची GDP प्रति capita (PPP) अंदाजे 11,940 डॉलर इतकी राहिली आहे, ज्यामुळे आपला देश श्रीमंत देशांच्या यादीत 124 व्या स्थानावर आहे. म्हणजेच आपला भारत देश टॉप 50 देशांच्या यादीत सुद्धा समाविष्ट नाही. खरेतर भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, अलीकडेच आपल्या देशाने जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान पटकावला आहे. परंतु आपल्या देशाची 140 कोटी लोकांची लोकसंख्या देशाचे प्रति capita उत्पन्न कमी करते. तथापी, अलीकडील काही वर्षांमध्ये आपल्या देशाने माहिती तंत्रज्ञान, सेवा, कृषी आणि उत्पादन क्षेत्रात लक्षणीय प्रगती केलेली आहे. मात्र असमान उत्पन्न वितरण आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रति capita संपत्ती फारच कमी राहिली आहे.






