META ची मोठी कारवाई 1 कोटी अकाउंट्स ब्लॉक करण्यात आले

“तुमचं कॉन्टेंट ओरिजिनल आहे का?”हा प्रश्न आता केवळ नैतिकतेचा नाही, तर सोशल मिडियावर अस्तित्वाचा झाला आहे!
Meta (Facebook आणि Instagram ची पालक कंपनी) ने नुकतीच एक मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी अकाउंट्स ब्लॉक केली आहेत!हे सर्व अकाउंट्स स्पॅम, कॉपी-पेस्ट किंवा इतरांच्या व्हिडिओज्/पोस्ट चोरून टाकणाऱ्या होते.त्यातले अनेक असेही होते जे पैशासाठी सिस्टममध्ये फेरफार करत होते – बनावट एंगेजमेंट, रिपिटेटिव्ह पोस्ट, फेक व्ह्यूज…यामध्ये 5 लाख अकाउंट्सना थेट दंड ठोठावण्यात आले आहेत. आता Meta वापरत आहे अॅडव्हान्स AI डिटेक्शन टूल्स – जे ओरिजिनल आणि चोरलेल्या व्हिडिओत तात्काळ फरक ओळखते!
➡️ याचा फायदा कोणाला होतोय?
👉 ओरिजिनल कंटेंट क्रिएटर्सना!आता त्यांच्या मेहनतीचं श्रेय त्यांनाच मिळेल.आणि चोरांवर लागेल चाप!
📌 जर तुम्ही सतत कॉपी केलेलं किंवा दुसऱ्याचं व्हिडिओ, पोस्ट शेअर करत असाल,तर फक्त तुमच्या पोस्टचं रिच कमी होणार नाही,तर तुमचं मोनेटायझेशनही बंद होणार!
🎯 लक्षात घ्या आजचा डिजिटल काळ “ओरिजिनॅलिटी” ची मागणी करतोय. मेहनतीने बनवलेलं एक व्हिडिओ, १० कॉपी केलेल्या पोस्ट्सपेक्षा जास्त परिणामकारक ठरतं.कृपया ओरिजिनल कंटेंट तयार करा आणि इतरांचं काम चोरणं थांबवा!






