News
लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाचा सण होणार गोड, जुलैचा हप्ता या दिवशी खात्यात होणार जमा

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्रीमाझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा सन्माननिधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 9 ऑगस्टला असलेल्या रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींचा रक्षा बंधनाचा सण आणखी गोड होणार आहे.
जुलैचा हप्ता 9 ऑगस्टपूर्वी खात्यात होणार जमा






