“महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असलेले आमदार | संपूर्ण माहिती”

आमदार कोण असतो ?
आमदार म्हणजे आपल्या मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती.
महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असलेले आमदार कोणते आहेत ? जाणून घेऊया आजच्या लेखात
महाराष्ट्रातील झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 या निकालानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने विजयी उमेदवारांची
गुन्हेगारी रेकॉर्ड आणि आर्थिक स्थिती शैक्षणिक पातळी आणि इतर माहितीचे संकलन विश्लेषण केले आहे.
यामध्ये 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये फौजदारी गुन्हे असलेल्या आमदारांची संख्या वाढलेली आहे,
आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेले 10 आमदार कोण आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ही सर्व माहिती उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देण्यात आली आहे.
10) महेश बालदी :
रायगड जिल्ह्याच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले महेश बालदी
हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहेत.
त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्यावर 11 गुन्हेगारी खटले दाखल आहे.
9) राजन बाळकृष्ण नाईक :
पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले राजन नाईक
हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत.
त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर 11 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
8) सुभाष देशमुख :
सोलापूर जिल्ह्याच्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले सुभाष देशमुख हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत.त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम केले आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत.
7) मेघना बोर्डीकर :
परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेल्या मेघना बोर्डीकर या महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत.
ते सध्या महाराष्ट्र सरकार मधील राज्यमंत्री आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
6) रत्नाकर गुट्टे :
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे ( रासप ) आमदार असलेले रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत.
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहे.
5) महेश सावंत :
मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे आमदार असलेले महेश सावंत हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण 13 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
4) नरेंद्र मेहता :
ठाणे जिल्ह्याच्या मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले नरेंद्र मेहता हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत.
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण 18 गुन्हेगारी खटले दाखल आहे.
3) विक्रम पाचपुते :
( अहमदनगर ) सध्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले आणि नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळेस आमदार राहिलेले बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर 21 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
2) नितेश नारायण राणे :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
ते सध्या महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर 38 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
1) अजित पवार :
पुणे जिल्ह्याच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गटाचे) पक्षाचे आमदार असलेले आणि सध्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञानुसार त्यांच्यावर 40 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
तळटीप : वरील लेखातील माहिती ही गुगलच्या माध्यमातून मिळाली आहे तरी वरील माहितीमध्ये थोडा फार अचूक असेल तर कमेंट करून दर्शवा.





