Marathi knowledge

कोकणातील पावसाळी पर्यटन स्थळे – निसर्गरम्य हिरवाईतला अविस्मरणीय अनुभव ;

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती असेल की, महाराष्ट्रामध्ये कोकण परिसर हा पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये भेट देण्याकरिता उत्कृष्ट असते. कोकणात वातावरण असते परंतु तुम्हाला माहिती आहे का? कोकणात पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी इतकी सुंदर वातावरण असते की ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

विशिष्ट पावसात कोकणामध्ये हिरवेगार डोंगर, धबधबे आणि नद्यांचे प्राकृतिक दृश्य अनुभवता येतात, कोकणात पावसाळ्यात फिरायला जाणे हा एक वेगळाच अनुभव असतो.

निसर्गाच्या हिरव्यागार सौंदर्यात आणि धबधब्यांच्या गर्जनेत कोकण अधिकच मोहक दिसतो.

पावसाळा म्हटला की महाराष्ट्रातील कोकण हा सर्वात सुंदर प्रदेश आठवतो. हिरवीगार दऱ्या, डोंगरमाथ्यावर पसरलेले धुके, दाट जंगलातून कोसळणारे धबधबे आणि गाजणारा समुद्र

यामुळे कोकण पावसाळ्यात अधिकच आकर्षक दिसतो. या हंगामात येथे फिरायला जाणाऱ्यांना निसर्गाची खरी मजा अनुभवायला मिळते. चला तर जाणून घेऊया कोकणातील अशी 5 ठिकाणे जी पावसाळ्यात नक्कीच पहावीत.

अंबोली घाट – धुक्याच्या कुशीतले सौंदर्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला आंबोली घाट हा महाराष्ट्राचा चेरापुंजी म्हणून ओळखला जातो. येथे भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे येथील दऱ्या आणि धबधबे खूप सुंदर दिसतात.

हिरण्यकेशी नदीचा उगम येथेच होतो आणि अनेक लहान मोठे धबधबे येथे पाहता येतात. जिल्ह्याच्या पश्‍चिम घाटात वसलेल्या आंबोली घाट कोकणातील एक हिल स्टेशन आहे. असे ठिकाण आहे की, पावसात भिजले सुंदर दिसते की तुमचं मन तिथेच रेंगाळत आहे.

अंबोली घाट पावसाळ्यात कुठे फिरावे ?

पावसाळ्यात आंबोलीचा डोंगरावर संपूर्ण धुक्याची चादर पसरलेली असते अनेक लहान-मोठे धबधबे तयार होतात, त्यांच्या नजरा खूपच सुंदर असतो. विशिष्ट अंबोली फॉल्स, नदीचे उगमस्थान आणि इको पॉईंट यांची खास पाहण्यासारखी स्थळ आहेत. घाटांची वळणदार रस्ते, धबधबे, निसर्ग आणि थोडीशी थंडी यांचा अंबोली घाटात तुम्हाला सुखद अनुभव येईल.

अंबोली घाट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अप्रतिम निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात घाटातील रस्ते दाट धुक्याने झाकले जातात. छोट्या-मोठ्या असंख्य धबधब्यांचा आनंद येथे घेता येतो. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासमान वाटते.

गणपतीपुळे बीच – शांत समुद्रकिनाऱ्याचा आनंद

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील सुंदर समुद्रकिनारा आणि गणपती मंदिर पर्यटकांना आकर्षित करते, विशेषतः पावसाळ्यात इथले निसर्गसौंदर्य अधिकच खुलते.

गणपतीपुळे बीच पावसाळ्यातील पर्यटन माहिती?

हे कोकणातील एक अत्यंत सुंदर आणि धार्मिक पर्यटनस्थळ आहे. तिथे पावसाळ्यात भेट घेण्याची मजा काही वेगळीच असते. पावसात गणपतीपुळे भोवतीच्या टेकड्या आणि परिसर हिरवागार होतो. रस्त्याच्या कडेला कोसळणारे धबधबे, निसर्गाचा गार वारा आणि पाणी भरलेला आकाश यांचा नजरा खरोखरच तुम्हाला शांततेचा अनुभव देऊन जातो.

तसेच सळणाऱ्या लाटा पाहून मन थक्क होऊन जाते आणि इथले स्वयंभू श्रीगणेश मंदिर पावसात फार शांत आणि अध्यात्मिक वाटते. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे बीच हा पावसाळ्यात अधिकच मोहक दिसतो. उंच उसळणाऱ्या लाटा, पावसाने स्वच्छ धुतलेला किनारा आणि श्री गणपती मंदिरामुळे या ठिकाणाला धार्मिक व पर्यटनदृष्ट्या वेगळीच ओळख आहे. पावसाळ्यातील समुद्र पाहण्यासाठी गणपतीपुळे हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

दापोली – समुद्रकिनारे आणि हिरवळ

दापोली हे कोकणातील अनेक लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ आहे. जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून या ठिकाणाला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. जिथे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. पावसाळ्यात इथे वातावरण खुपच छान असते.

दापोलीतील पावसाळ्यातील समुद्रकिनारे

दापोलीतील समुद्रकिनारे आणि धबधबे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. तसेच काही ठिकाणी असलेले धबधबा या ठिकाणचे वातावरण पावसाळी मंत्रमुग्ध करते. रत्नागिरी पासून दापोली हे ठिकाण तब्बल 148 किलोमीटर अंतरावर आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हा छोटासा शहर असून त्याच्या आसपास अनेक स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. पावसाळ्यातील शांत वातावरण, हिरवाई आणि किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा यामुळे दापोली एक वेगळाच अनुभव देते. स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वादही येथे घेता येतो.

कोकणातील पावसाळी पर्यटन स्थळे यामध्ये हा एक तुमचा आवडता पर्यटन स्थळ होऊ शकतो

हरिहरेश्वर – निसर्ग, हिरवाई आणि समुद्रकिनारे

कोकण भेट देण्याकरिता उत्कृष्ट ठिकाण आहे. हे महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे आणि हे ठिकाण रायगड जिल्ह्यात कोकण किनार्‍यावर वसलेले आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात अतिशय छान असते ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

पावसाळ्यात हरिहरेश्वरच्या हिरवेगार डोंगर रांगा आणि समुद्रकिनारा येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच मोहित करतो. तसेच पावसाळ्यात पर्यटकांची संख्याही कमी असल्यामुळे हरिहरेश्वरमध्ये शांत आणि एकांत वाढतो.

मालवण – इतिहास आणि निसर्गाचा संगम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मनमोहक समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक शहर आहे. ज्याला पावसाळ्यात तुम्हाला एक विशेष अनुभव मिळेल. डोंगर रांगा, नारळी पागा आणि तेजस्वी हिरवळ अधिकच खुलून दिसते.

धुक्याने वेढलेले डोंगर, पावसाच्या धबधबे अतिशय सुंदर असतो, त्यामुळे तुम्ही पावसाचा अंदाज बघून या ठिकाणाला भेट देऊ शकता. त्याचबरोबर मालवण हे कोकणी माशांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे पावसाळ्यात इथे सोला, कालवण, अळूची भाजी, तिखट मासळी यासारख्या पारंपारिक पदार्थाचा आस्वाद घेता येतो.

कोकणातील पावसाळी पर्यटन स्थळे यामधील हा एक स्थळ तुमचा आवडता पर्यटन स्थळ होऊ शकतो

कोकणातील पावसाळी पर्यटन हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. अंबोली घाटातील धुके, गणपतीपुळेचा किनारा, दापोलीची हिरवाई आणि मालवणची समुद्रकिनारी सफर – हे सर्व मिळून पावसाळ्यात कोकण अधिकच मोहक बनतो. मात्र, प्रवास करताना हवामानाची काळजी घेणे, पावसाळी साहित्य सोबत ठेवणे आणि सुरक्षितता पाळणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button