पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर
Punekars, drive responsibly! Now AI cameras will catch those violating traffic rules

पुणे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पुणे पोलिसांकडून एआय (Artificial Intelligence) आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीच्या प्रायोगिक चाचणीस काल सायंकाळी फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेल समोर प्रारंभ करण्यात येणार आहे.
या प्रणालीचा उद्देश म्हणजे, शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे, त्याची नोंद ठेवणे. आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचा तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन यातून अमलात आणला जाणार आहे.या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, तसेच पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहतूक उल्लंघनास त्वरित प्रतिसाद देणे, वेळेत दंड आकारणी करणे, आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. शहरातील वाहतूक समस्या सुटाव्यात आणि अपघातांमध्ये घट होण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
चेहरा आणि गाडीचा नंबर ओळखणारी यंत्रणा :
ही नवीन यंत्रणा फेस रिकॉग्निशन आणि वाहन क्रमांक ओळखणाऱ्या प्रणालीवर आधारित असून, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे, अशा विविध उल्लंघनांवर अचूक नजर ठेवते. नियम मोडल्यास दंडाची पावती थेट ई-मेल किंवा चालान पोर्टलवर पाठवली जाते.(Pune Traffic Alert)AI कॅमेऱ्यांच्या साहाय्याने एका दुचाकी स्वाराने नियम मोडताच तात्काळ दंड आकारण्यात आला, हे या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरले. पुढील आठवड्यात ही यंत्रणा शहराच्या इतर प्रमुख रस्त्यांवर देखील लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ही नियमभंगकोणासाठी लागू होणार? :-
चुकीच्या दिशेने (Wrong Side) वाहन चालवणे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे सिग्नल तोडणे ओव्हरस्पीडिंग आणि लेन कटिंगपुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, AI तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारची माफी शक्य नाही. सर्व कारवाई पूर्णतः ऑटोमेटेड असल्यामुळे नियम तोडल्यास लगेच दंड लागेल. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वाहन चालवणे आवश्यक आहे.






