News
एअर इंडिया पायलटची 3.16 कोटींची फसवणूक

अंधेरीतील एअर इंडियाच्या एका पायलटची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 3.16 कोटींची फसवणूक केली. फ्रेडी फिरोज दारुवाला यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
दारुवाला यांनी मे 2025 मध्ये यूट्यूबवर शेअर मार्केटचे व्हिडीओ पाहिले. नंतर त्यांना व्हॉट्सअपवर अनुप्रिता दागा या महिलेने संपर्क केला. तिने एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगितले. एसएमसी नावाचे बनावट ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ऍपवरून आयपीओ आणि शेअर्स खरेदी करण्यासाठी दारुवाला यांनी एकूण 3.16 कोटी विविध बँक खात्यांमध्ये भरले.




