मुंबईतील हिरे व्यापाऱ्याचे 98 लाखांचे हिरे घेऊन दलाल झाला फरार
मुंबईतील हिरे व्यापाऱ्याचे 98 लाखांचे हिरे घेऊन दलाल झाला फरार

बीकेसी येथील एका व्यापाऱ्याचे 98 लाखांचे हिरे घेऊन दलाल फरार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी बीकेसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार विपुलभाई धामी (47) यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांचे बीकेसीत कार्यालय आहे. व्यवसायानिमित्त त्यांच्या कंपनीत अनेक हिरे दलाल येत असतात. जिग्नेश मेहता त्यांचे नियमित व्यवहार करणारे हिरे दलाल असून, त्यांनी धामी यांना एका कंपनीची माहिती देत त्या कंपनीला चांगल्या प्रतीच्या हिऱ्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार धामी यांनी पलक मेहता याच्याशी संपर्क साधला. मेहताने धामी यांच्याकडून 98 लाख 60 हजार किमतीचे 328.67 कॅरेटचे हिरे विकत घेतले. या वेळी हिरे देताना धामी यांनी रितसर पावती घेतली होती. सदर हिऱ्यांचा व्यवहार पूर्ण करून 15 दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन मेहता यांनी दिली. मात्र, 15 दिवस उलटूनही पलक मेहताने हिऱ्यांचे पैसे दिले नाहीत.