अनोळखी मेसेजला क्लिक करणे महागात पडले || सायबर टोळीने घातला 45 लाख रुपयांचा गंडा

अज्ञात व्यक्तीच्या मेसेजला प्रतिसाद देणे खारघरमधील एका 80 वर्षीय नागरिकाला चांगलेच महागात पडले. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीने या ज्येष्ठाच्या व्हॉट्स ॲपवर मेसेज पाठवून त्याला 5 रुपयांच्या 100 नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याच्या बहाणा करुन तसेच दुबईतील 30 लाखांची लॉटरी लागल्याच्या आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल 45 लाख 70 हजार रुपये उकळले.ज्येष्ठ नागरिक खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रक्कमेवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. टोळीने त्यांना व्हॉट्स अॅपवर मेसेज पाठवून 5 रुपयाच्या 100 नोटांच्या बदल्यात 2 कोटी 98 लाख 56 हजार रुपये मिळतील असे अमिष दाखवले.
सायबर टोळीतील सदस्यांनी त्यांना संपर्क साधून 2 कोटी 98 लाख 56 हजाराची रक्कम मिळवण्यासाठी त्यांना 3 लाख 75 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यावर नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2024 या दोन महिन्यात तब्बल 8 लाख 80 हजार रुपये सायबर टोळीला पाठवून दिले. तसेच दुबई येथे 30 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून त्यांना 1 लाख रुपये फी भरावी लागेल, असे सांगितले. ही रक्कमही त्यांनी पाठवून दिला. असा प्रकारे त्यांनी एकून 45 लाख रुपये पाठवून दिले.