1 ग्रॅम सोनं विकल्यावर ज्वेलर्सला किती कमाई होते? पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोन्याचे भाव हे सध्या गगणाला भीडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांसाठी थोडं कठीण होऊन बसलंय. दरम्यान आज आपण सोन्याविषयी काही महत्त्वाची गोष्टी जाणून घेणार आहोत.
सोने हे भारतात नेहमीच आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक मानलं गेलं आहे. वाढत्या सोन्याच्या किमतींमुळे लोकांना ज्वेलर्सकडे जाणं खूप महागडं वाटत आहे. पण लग्नसराई किंवा इतर काही कामांच्या वेळी सोनं खरेदी करावंच लागतं.सोन्याच्या किंमती कमी जास्त होत राहतात. पण त्याचबरोबर ‘१ ग्रॅम सोन्यावर सोनारांना किती नफा होतो?’ हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
ज्वेलर्स सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस आकारतात, जो दागिने बनवण्याच्या खर्चावर, डिझाइनवर आणि कारागिरीवर अवलंबून असतो. इकॉनॉमिक टाईम्स हिंदीनुसार, हा चार्जेस साधारणपणे 5% ते 20-25% पर्यंत असू शकतो. उदाहरणार्थ, प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी 200 ते 700 रुपये मेकिंग चार्जेस आकारले जाऊ शकतात.ज्वेलर्स सोने खरेदी आणि विक्री करताना जो फरक ठेवतो त्याला स्प्रेड म्हणतात. या स्प्रेडमुळे ज्वेलर्सना आर्थिक लाभ मिळतो. उदाहरणार्थ, जर ज्वेलर्स सोनं 5,500 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करत असेल आणि तुम्हाला 5,800 रुपये प्रति ग्रॅमने विकत असेल, तर त्यातील ₹300 हा फरक म्हणजेच स्प्रेड.
सोने विकताना, 1 ग्रॅम सोन्यावर ज्वेलर्सना ₹800-₹1500 पर्यंत नफा मिळू शकतो. पण हा नफा दुकानाचा खर्च, कारीगरांचा वेतन, आणि मार्केटच्या स्थितीनुसार बदलतो. यासोबतच यामध्ये मार्केटचे उतार-चढाव आणि GST यांसारख्या अनेक घटकांवर नफा अवलंबून असतोसोने महागल्यामुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. काही ग्राहक जुने दागिने विकून नवीन खरेदी करत आहेत, तर काही कमी खरेदी करत आहेत. या बदलामुळे सोनारांचे नफा प्रमाण काहीशी घटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार मुंबईतील झवेरी बाजारातील कारीगरांची मासिक कमाई काही ठिकाणी आधीच्या तुलनेत 50% कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कारीगर आपल्या मूळ गावाकडे परतले आहेत.महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक ज्वेलर्सचे मेकिंग चार्जेस, त्यासोबतच सोनं किती कॅरेटचं आहे, GST आणि इतर टॅक्स या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो. प्रत्येक ज्वेलर्सला यामागे वेगवेगळा नफा होऊ शकतो. प्रत्येक ज्वेलर्सचा नफा हा वेगवेगळा असू शकतो.






