माधुरी दीक्षितचा नवरा श्रीराम नेने दर महिन्याला किती कमावतो? आकडेवारी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

लग्नानंतर माधुरी दीक्षित तिच्या पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली होती. जवळपास दहा वर्षांनंतर माधुरी पुन्हा भारतात परतली आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. माधुरीचा पती श्रीराम नेने दर महिन्याला किती कमावतो हे तुम्हाला माहीत आहे का?
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. ऑक्टोबर 1999 मध्ये लग्न केल्यानंतर माधुरी दिक्षित अमेरिकेतील डेन्वर याठिकाणी स्थायिक झाली. तिथे ती जवळपास दहा वर्षे राहिली.
त्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये ती तिच्या कुटुंबीयांसह भारतात परतली आणि इथे पुन्हा अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. माधुरी एके काळी तिच्या कारकिर्दीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होते. तर तिचे पती डॉ. श्रीराम नेनेसुद्धा कमाईच्या बाबतीत काही मागे नव्हते. ते फक्त हृदयरोगतज्ज्ञ नव्हते तर एक उद्योजकदेखील होते.
अमेरिकेत यशस्वी सर्जन म्हणून नाव कमावल्यानंतर त्यांनी भारतातील डिजिटल आरोग्यसेवा क्षेत्रात पाऊल ठेवलं.श्रीराम नेनेंनी पाथफाइंडर हेल्थ सायन्सेस कंपनी सुरू केली. इतकंच नाही तर त्यांचा आयआयटी जोधपूरच्या सल्लागार मंडळातही समावेश होता. माधुरीची एकूण संपत्ती ही जवळपास 250 कोटी रुपयांच्या घरात असून डॉ. श्रीराम नेने हेसुद्धा 100 ते 150 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. या दोघांची संपत्ती मिळून 350 ते 400 कोटी रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीराम नेने यांचं वार्षिक उत्पन्न 98 लाख रुपये आहे. म्हणजेच ते दर महिन्याला सात लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात.
