वटपौर्णिमेला कुऱ्हाडीने वार करून पत्नीने केला पतीचा खून पत्नीस अटक : कौटुंबिक कारणातून कृत्य
वटपौर्णिमेला कुऱ्हाडीने वार करून पत्नीने केला पतीचा खून पत्नीस अटक : कौटुंबिक कारणातून कृत्य

कुपवाड शहरातील एकता कॉलनीत वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केला. अनिल तानाजी लोखंडे (53) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयित पत्नी राधिका अनिल लोखंडे (27) हिला अटक केली आहे.
मृत अनिल लोखंडे हे गवंडी काम करीत होते. त्याची पहिली पत्नी वैशाली हिचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. वैशाली व अनिल यांना काजल व शिवानी या दोन मुली असून त्या सासरी आहेत. त्यामुळे अनिल घरी एकटेच राहत होते. नातेवाईकांनी त्यांचे दुसरे लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार वडी (ता. खटाव जि. सातारा) येथील बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका हिच्यासमवेत २३ मे २०२५ रोजी माधवनगर येथील एका मंदिरात दोघांचे लग्न लावले. वटपौर्णिमेदिवशी रात्री पती मला शरीरसंबंध ठेवण्यास बोलत होते. परंतु माझी शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा नव्हती. त्या कारणावरून माझा पतीसमवेत वाद झाला. त्यानंतर पती अनिल झोपी गेले. त्यावेळी त्यांचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच माधवनगर मधील नातेवाईकांनी अहिल्यानगर येथे अनिल लोखंडे यांच्या घरी तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता. अनिल अंथरूणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.




