News

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खबर ! जून महिन्याच्या हफ्ता ‘या’ तारखेला जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एक नवीन बातमी समोर आली आहे. खरे तर सध्या लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी या योजनेच्या पुढील हफ्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता म्हणजेच बारावा हफ्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो ? या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झाली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 पासून या योजनेच्या पात्र महिलांना लाभ दिला जात आहे.म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधी मधील एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

मे महिन्याचा हप्ता हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मे महिन्याचा लाभ जून महिन्याच्या सुरुवातीला पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला असून आता या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून जून महिन्याच्या हप्त्याची विचारणा केली जात आहे.खरंतर मे महिन्याचा लाभ जून महिन्यात मिळाला असल्याने जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल आहे. जून महिन्याचा हप्ता जून महिन्यातच मिळणार की जुलै महिन्यात असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित होतोय.

पण मीडिया रिपोर्ट वर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.पण या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही यामुळे जून महिन्याचा लाभ हा या महिन्याचा शेवटी मिळतो की जुलै महिन्यात दिला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

1500 की 2100 जमा होणार ?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभदेव असे म्हटले होते. मात्र महायुतीचे सरकार स्थापित होऊन आता बरेच दिवस झाले आहेत तरीही या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही.पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत.म्हणून आता या शेवटच्या दिवसांत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात असा दावा केला जात आहे. पण 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button