या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेचा उद्देश:
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही महत्वाकांक्षी योजना सध्या खूप चर्चेत आहे. या योजने अंतर्गत दरमहा 1500 रुपये थेट पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, आता या योजनेच्या अर्जाची आणि कागदपत्रांची फेर तपासणी सुरू झाली आहे. यामुळे अनेक लाभार्थी महिलांना आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन सर्वांची माहिती तपासणार आहेत. यामुळे लाडकी बहीण योजना एकंदरीत अधिक पारदर्शी होण्याची शक्यता आहे. पण कोणत्या महिला अपात्र ठरणार? कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेट नाही आणि नवीन कोणते निकष लागू होणार? चला जाणून घेऊया.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये काही चुकीची माहिती किंवा फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे सरकारने पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेर तपासणी प्रक्रियेत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा सहभाग असेल. लाडकी बहीण योजना अंतर्गत फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी ही पडताळणी महत्वाची आहे. या प्रक्रियेमुळे योजनेची विश्वासार्हता वाढेल आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजना ; पुढील 6 नवीन निकष
वय मर्यादाः लाभार्थी महिला 18 ते 65 वयोगटातील असावी.
उत्पन्न मर्यादाः लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
चारचाकी वाहनः लाभार्थ्यांच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नसावे.
आयकर दाताः लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता नसावा.
शासकीय नोकरीः लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा.
रहिवासः लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
या फेर तपासणी प्रक्रियेत अंगणवाडी सेविका मुख्य भूमिका बजावणार आहेत. त्या प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्यांनी अर्जात दिलेल्या माहितीची पडताळणी करतील. यामध्ये उत्पन्न, वाहन मालकी आणि इतर कागदपत्रांचा समावेश असेल. परिवहन आणि आयकर विभागाच्या सहकार्याने ही माहिती क्रॉस-व्हेरिफाय केली जाईल. लाडकी बहीण योजना अंतर्गत चुकीची माहिती देणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना या पुढील हप्ते मिळणार नाहीत.
फेर तपासणी दरम्यान अंगणवाडी सेविका खालील कागदपत्रांची तपासणी करतील. यामुळे लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीतः
आधार कार्ड – लाभार्थ्यांची ओळख पटवणे
उत्पन्नाचा दाखला – उत्पन्न मर्यादा तपासणे
रहिवास प्रमाणपत्र – लाभार्थी हा महाराष्ट्र रहिवास सिद्ध करणे
बँक खाते तपशील – आर्थिक व्यवहार तपासणे
अपात्र महिलांवर काय कारवाई होणार?
जर एखादी महिला योजना अंतर्गत अपात्र ठरली, तर तिचा लाभ बंद होईल. तसेच, चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे आढळल्यास, सरकार त्या लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू शकते. यामुळे अर्ज करताना खरी माहिती देणे अत्यंत महत्वाचे आहे. सरकारने यासाठी ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल आणि हेल्पलाइन सुरू केली आहे, जिथे लाभार्थी आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी योजना अंमलात आणली. फेर तपासणीमुळे योजनेची पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळेल. सरकारने योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. यामुळे स्थानिक स्तरावर अर्ज तपासणी आणि तक्रार निवारण जलद होईल. महिलांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावीत आणि अंगणवाडी सेविकांना सहकार्य करावे, जेणे करून लाडकी बहीण योजना चा लाभ मिळू शकेल.
बांधकाम कामगार योजना 2025: लाभार्थ्यांना रोख ₹5000 आणि मोफत भांडी सेट सह अनेक फायदे मिळणार
अधिक माहितीसाठी क्लिक करा






