News

ऑनलाईन गेमिंगमध्ये कंगाल मॅनेजरने रचला बँकेच्या 25 लाख रुपये लुटीचा बनाव

तुळजापूर तालुक्यातील इटकळजवळ टोलनाक्याच्या पुढे अज्ञात दुचाकीस्वारांनी डोळ्यात तिखट टाकून जवळील 25 लाख रुपयांची रक्कम दि. 30 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सुटल्याची तक्रार लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँकच्या नळदुर्ग शाखाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. यामुळे अलर्ट झालेल्या नळदुर्ग पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. मात्र, तपासादरम्यान चोरावर मौर होत शाखाधिकाऱ्यानेच हा बनाव केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत अवघ्या 24 तासात प्रकरणाचा छडा लावला.

मॅनेजर ऑनलाईन गेमिंगमध्ये कंगाल झाला होता यातूनच त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.30 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नळदुर्ग शाखेतून 25 लाख रुपयांची’ रोख रक्कम सोलापूरकडे घेऊन जाणाऱ्या शाखाधिकारी कैलास घाटे (वय 35 रा नळदुर्ग) यांना दुचाकीस्वार दोघांनी मारहाण करुन, डोळयात चटणी टाकून रक्कम लुटल्याची तक्रार नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल झाली. हा प्रकार सोलापूर ते हैदराबाद महामार्गावर इटकळजवळ घडल्याचे शाखाधिकाऱ्यांने सांगितले. यावेळी चोरट्यांनी धारधार शस्त्राने वारही केल्याचे घाटे यांनी तक्रारीत नमूद केलेयाबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. सदरील घटनेमधील जखमी व्यक्ती कैलास घाटे याची सार्वजनिक रुग्णालय नळदुर्ग येथे भेट घेऊन त्याच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळविण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तीन टिम तयार करुन त्यांना सूचना करत तपास सुरू केला.

यावेळी फियांदी कैलास घाटेची सखोल चौकशी करत असताना त्याच्या देहबोलीवरून या गुन्ह्यात त्याचाच सहभाग असल्याची दाट शक्यता समोर येऊ लागली. त्यानंतर केलेल्या चौकशीत हा सर्व बनाव त्यानेच रचून बँकेची रक्कम लुटल्याचे समोर आले. त्याच्याकडून चोरीतील रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.असा झाला बनाव उघड !…. फिर्यादी कैलास घाटे योध्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी करत असताना घाटे याची देहबोली पोलिसांना संशयास्पद वाटत होती. यामुळे एलसीबी पथकाने त्याची पार्श्वभूमीवर व वैयक्तीक माहितीसह तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून तपास सुरू केला. तेव्हा कैलास घाटे हा ऑनलाईन गेमिंग खेळत असल्याचे व तो कर्जबाजरी झाल्याचे समोर आले. त्यानुसार काही प्रश्न विचारून चौकशी करवाना उडवाउडवीची उत्तरे मिळट असल्याने त्यास पोलिसी खाक्या दाखवून सखोल चौकशी केल्यावर त्याने पैशाच्या गरजेतून स्वतःच हा रक्कम लुटीचा बनाव केल्याचे, धारधार शस्त्राने स्वतःच अंगावर जखमा करून घेतल्याचे कबूल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button