News

तृणमूल काँग्रेसच्या ग्लॅमरस खासदार महुआ मोईत्रा झाल्या विवाहबद्ध

तृणमूल काँग्रेसच्या ग्लॅमरस खासदार महुआ मोईत्रा झाल्या विवाहबद्ध

तृणमूल काँग्रेसच्या ग्लॅमरस लोकसभा खासदार महुआ मोईत्रा बीजू जनता दलाचे ६५ वर्षीय नेते पिनाकी मिश्रा यांच्यासोबत विवाहाच्या बंधनात अडकल्या आहेत. जर्मनीत त्यांनी गुपचूप विवाह सोहळा उरकल्याचे वृत्त आहे. या लग्नाबाबत मोईत्रा किंवा मिश्रा यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. जर्मनीत गत महिन्यातील एका खासगी सोहळ्यात ५० वर्षीय मोईत्रा व मिश्रा यांची रेशीमगाठ बांधली सोबत असलेले छायाचित्र प्रसारमाध्यमांमधून झळकल्यानेही त्यांच्या विवाहाच्या चर्चेला हवा मिळाली आहे. अशातच मोईत्रांच्या सहकारी तृणमूलच्या खासदार सायोनी घोष यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया मंचावरून मोईत्रा व मिश्रा यांच्या सोबतचा एक जुना फोटो शेअर करीत या दाम्पत्यास विवाहाबद्दल शुभेच्छा दिल्या. आपणास आयुष्यभराचे प्रेम व आनंद मिळतराहो, अशी शुभकामना करीत असल्याचेही घोष यांनी या संदेशात नमूद केले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, दोघांचाही हा दुसरा विवाह, आहे. मोईत्रा यांचे पहिले पती डॅनिश व्यावसायिक लार्स ब्रोरसन होते. त्यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर एका अन्य वकिलाशी त्यांची जवळीक वाढली होती. तर मिश्रा यांना पहिल्या पत्नीकडून एक मुलगा व एक मुलगी असल्याचेही समजते.

मोईत्रा पश्चिम बंगालच्या कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघात २०१९ साली व त्यानंतर २०२४ साली त्या निवडून आल्या. गत निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांना पराभूत केले होते. तर वकील असलेले मिश्रा यांनी ओडिशाच्या पुरी मतदारसंघातून १९९६ साली काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदारकी जिंकली होती. त्यानंतर बीजदकडून २०१४ व २०१९ साली दोनदा खासदारपदी निवडून आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button