News

दुप्पट परतावा देतो म्हणत एकाला लाखोंचा गंडा | बीडमधील घटना; फसवी लिंक देऊन उकळले पैसे

तीन महिन्यात दाम दुप्पट रक्कम मिळेल’ असे आमिष दाखवत बीड येथील एका नागरिकाची तब्बल 9 लाख 88 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोन मोबाईल धारकांविरुध्द गुन्हा दाखल झाला. ‘एका कंपनीच्या लिंकवर पैसे भरावेत, त्यातून तुम्हाला तीन महिन्यांत दुप्पट रक्कम मिळेल’ असे सांगत फसवणूक करणाऱ्याने नागरिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 13 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2025 दरम्यान विविध ॲप द्वारे लाखो रुपये हस्तांतरित करण्यात आले. तसेच साडेचार लाख रुपये रोख स्वरूपातही घेतल्याचेही तक्रारीत नमूद केले असून नागरिकाची अशाप्रकारे एकूण 9 लाख 88 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली.

संपर्क क्रमांक ब्लॉक

> नागरिकाने पैशांबाबत विचारणा केली असता संबंधिताने संपर्क ब्लॉक केला आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 14 जून 2025 रोजी संबंधिताने महाराष्ट्र सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल केली. या प्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात दोन मोबाइलधारकांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button