‘या’ आजाराच्या समस्या असणाऱ्या लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये….

केळी ही आरोग्यासाठी उत्तम मानली जाते याच्या नियमित सेवनाने शरीर मजबूत होतं.केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.केळ्यांमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळी करते.
पण काही लोकांना केळी आरोग्यासाठी फायदेशीर असली तर काहींसाठी ती नुकसानकारक आहे.केळी कोणी खाऊ नये याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
किडनीची समस्या
ज्या लोकांना किडनीची ची समस्या त्यांनी केळीचे जास्त सेवन करू नये.
ऍलर्जी
ज्यांना ऍलर्जी आहे त्या लोकांनीही केळीच्या सेवनापासुन दूर राहिले पाहिजे .
मधुमेह
मधुमेहच्या रुग्णाने केळीचे अधिक सेवन करू नये.
वजन कमी करणारे
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी केळी खाऊ नये.