News

जर तुमचाही मोबाईल जुना असेल तर तुम्ही WhatsApp वापरू शकणार नाही ! 1 जून नंतर ‘या’ मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार

जर तुमचाही मोबाईल जुना असेल तर तुम्ही WhatsApp वापरू शकणार नाही ! 1 जूननंतर 'या' मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार

आजकाल प्रत्येकजण WhatsApp वापर करतात आणि काहीही दिनचर्या तर WhatsApp ने चालू होई.Whatsapp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स असून व्हाट्सअपच्या माध्यमातून आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत चॅटिंग करणं, फोटो विडिओ शेअर करणे, गाणी शेअर करणे अशी अनेक कामे करता येतात.

आजकाल Whatsapp वरून पैसेही पाठवता येतात. त्यामुळे जगात जवळपास सर्वच मोबाईल यूजर्स Whatsapp वापर करतात. पण आता Whatsapp काही मोबाईल मधून आपला सपोर्ट काढून घेणार आहे. म्हणजेच काय तर काही मोबाईल मधून व्हाट्सअप बंद होणार आहे. आजपासून म्हणजेच १ जूनपासून हि प्रक्रिया सुरु होणार आहे.

कोणत्या मोबाईल मधून बंद होणार व्हाट्सअप?

iPhone 5s

iPhone 6

iPhone 6 Plus

iPhone 6s

iPhone 6s Plus

iPhone SE (1st gen)

Samsung Galaxy S4

Samsung Galaxy Note 3

Sony Xperia Z1

LG G2.

Huawei Ascend P6

Moto G (1st Gen)

Motorola Razr HD

Moto E 2014

मेटाच्या मते, WhatsApp बंद करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सुरक्षा… जुन्या मोबाईलला आता सॉफ्टवेअर अपडेट्स मिळत नाहीत. त्यामुळे मोबाईल हॅक होण्याचा धोका असतो. म्हणूनच Whatsapp आपल्या यूजर्सना नवीन हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमवर जाण्यास सांगत आहे. अलीकडेच व्हॉट्सअपने चॅट लॉक, कंटेंट कॉपी रोखण्यासाठी फीचर आणि मेसेज ऑटो-डिलीटसाठी चांगल्या सेटिंग्ज यासारखे अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. ही फीचर्स फक्त नवीन ऑपरेटिंग सिस्टीम वरच चांगल्या प्रकारे काम करतात.जर तुम्ही iOS 15.1 किंवा Android 5.1 किंवा त्यावरील व्हर्जन वापरत असाल, तर तुमचं WhatsApp सुरूच राहील. परंतु जर तुमचा मोबाईल अपडेट होत नसेल तर नवीन मोबाईल घेण्यापूर्वी WhatsApp डेटाचा बॅकअप घ्या. यासाठी, WhatsApp ओपन करा. त्यानंतर Settings > Chats > Chat Backup वर जा, Google Account वरून बॅकअप घ्या. यामुळे तुमचे आत्तापर्यंतचे संपूर्ण व्हाट्सअप चॅटिंग एका क्लिकवर नवीन मोबाईल मध्ये ट्रान्सफर केले जातील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button