आ सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून नगरकडे जाणाऱ्या एमजी ग्लोस्टर या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पळवे खुर्द येथील नितीन शेळके (३४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर आहे. या प्रकरणी याच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन प्रकाश शेळके हे जातेगाव फाटा येथे सह्याद्री नावाचे हॉटेल चालवत होते. दिनांक 7 सोमवारी रात्री ते हॉटेलवरून दुचाकीने घरी निघाले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जातेगाव फाटा येथील नगरकडे जाणारा रस्ता ओलांडताना वेगाने नगरकडे जाणाऱ्या एमजी त्यांच्या दुचाकी (MH-16-DJ- 3765) ला भरधाव ग्लोस्टर (MH-23-2929) या कारचा चालक सागर सुरेश धस याने जोराची धडक दिली. त्यात नितीन हे चिरडले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, नितीन यांचा चुलतभाऊ स्वप्निल पोपट यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी नितीनला तत्काळ सुपा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.



