सावरकरांनी लिहिलीलेली शिवरायांची एकमेव आरती वाचून अंगावर येईल काटा !
सावरकरांनी लिहिलीलेली शिवरायांची एकमेव आरती वाचून अंगावर येईल काटा !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक कवींनी शाहिरांनी अनेक काव्य, पोवाडा रचले आहेत. अनेक गाणी देखील लिहिले आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांवर एक आरतीदेखील रचण्यात आली आहे.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एकमेव आरती लिहिली आहे.
मात्र सावरकरांनी रचलेल्या या आरतीबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या म्युझिक अल्बममध्ये लता मंगेशकर यांनी ही आरती गायली आहे.
सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ ही कवितादेखील रचलेली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर लिहिली आरती अशी आहे -“आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला । आला आला सावध हो भूपाला । सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला । करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला ।।” ही आरती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचली आहे.





