अख्ख्या टीमची वाट लावली तरी माघार नाही, धोनी म्हणतो 2026ची आयपीएल मी खेळणार
अख्ख्या टीमची वाट लावली तरी माघार नाही, आता धोनी म्हणतो 2026ची आयपीएल खेळणार

चेन्नईने हंगामाचा शेवट गोड केला आहे. त्यामुळे शेवट गोड झाल्यानंतर धोनी देखील आयपीएलमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा होती. मात्र नेहमीप्रमाणे धोनीने निवृत्तीवर सस्पेन्स कायम ठेवत, पुढच्या वर्षी देखील आयपीएल खेळण्याचे संकेत दिले आहे..
आयपीएलच्या कालच्या सामन्यात प्लेऑफमधून बाहेर झालेल्या चेन्नई सूपर किंग्जने 82 धावांनी टेबल टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईने हंगामाचा शेवट गोड केला आहे. त्यामुळे शेवट गोड झाल्यानंतर धोनी देखील आयपीएलमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा होती.
मात्र नेहमीप्रमाणे धोनीने निवृत्तीवर सस्पेन्स कायम ठेवत, पुढच्या वर्षी देखील आयपीएल खेळण्याचे संकेत दिले आहे.सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, आजचा हंगाम हाऊसफुल होता असे तर मी म्हणणार नाही. आमचा हंगाम चांगला नव्हता, तो त्या परिपूर्ण कामगिरींपैकी एक होता. आम्ही फार चांगले झेल घेतले नाहीत, पण आजचे झेल चांगले होते, असे धोनी म्हणाला.
आयपीएलमधील निवृत्तीवर बोलताना धोनी म्हणाला की, माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी अजून 4-5 महिने आहेत, घाई नाही. आता मी रांचीला परत जाईन, काही बाईक राइडिंगचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की मी संपलो आहे, मी असेही म्हणत नाही की मी येत आहे. माझ्याकडे वेळेची सोय आहे. त्याबद्दल विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन, असे म्हणत धोनीने पुन्हा निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
तसेच जर क्रिकेटपटू त्यांच्या कामगिरीसाठी निवृत्त होऊ लागले तर त्यापैकी काही 22 व्या वर्षी निवृत्त होतील, असेही धोनी म्हणाला.जेव्हा आम्ही हंगाम सुरू केला तेव्हा चार सामने चेन्नईमध्ये होते. आम्ही दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण मला वाटले की पहिल्या डावात फलंदाजीसाठी विकेट चांगली आहे. मला फलंदाजी विभागाची काळजी होती. आम्ही बोर्डवर धावा टाकू शकतो, परंतु काही छिद्रे भरायची आहेत. रुतुराजला पुढच्या हंगामात खूप गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असेही धोनी म्हणाला आहे.
