जगातील सर्वात महागडे मसाले कोणते आहे ? हा मसाला तर 380000 रुपये किलो विकला जातो
What are the most expensive spices in the world?

भारत देश हा जगातील सर्वात मोठा मसाले निर्यात करणारा देश आहे. भारतात जगातील सगळ्यात जास्त मसालेचे उत्पादन घेतले जातात.आपल्या जेवणामध्ये मसाले नसले तर जेवणात चव लागत नाही पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग मसाले कोणते आहेत ?
जगातील सगळ्यात महाग मसाल्यात पाहिला नंबर लागतो तो म्हणजे ..
१) केसर
इराण / इराक भागातून औरंगझेबाने काश्मीरला आणले आणि त्याची शेती सुरु केली. १ एकर मध्ये जास्तीत जास्त २०० ग्राम पर्यंत केसर निघते, तएका सुंदर जांभळ्या गुलाबी रंगाच्या फुलाचे पराग जेमतेम ५/६ म्हणजे केसर.बाजारात उत्तम प्रतीचे केसर कमीतकमी ३,८०,०००/-रुपये प्रति किलो विकल्या जातं.

२) नैसर्गिक व्हॅनिला
दक्षिण आणि मध्य अमेरिकेत याची शेती होते. उत्तम प्रकारच्या व्हॅनिला शेंगांची (pods) ची किंमत १,५०,०००/- रुपये प्रति किलो आहे.

३) हिरवी विलायची
दक्षिण भारतात मिळणाऱ्या सगळ्या मसाल्यात सर्वात महाग म्हणजे हिरवी विलायची. उत्तम प्रकारची विलायची बाजारात ८,०००/- रुपये प्रति किलो आहे.या नंतर काळे मिरे, मोठी/ मसाला विलायची, दालचिनी, लवंग इत्यादी मसाले त्यांच्या गुणवत्ते नुसार ३,०००/- ते ५,०००/- रुपये प्रति किलो प्रमाणे मिळतात.






