हेल्मेटला मराठी मध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहीतच नाही
आपण दैनंदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्दांचा अगदी सहज वापर करतो. त्याची आपल्याला सवयच होऊन जाते.

आपण दैनंदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्दांचा अगदी सहज वापर करतो. त्याची आपल्याला सवयच होऊन जाते.
ही सवय इतकी होते, की आपल्याला जर अचानक कोणी या शब्दांसाठीचा मराठी शब्द विचारला तर आपल्याला तो सांगता येत नाही. असे अनेक शब्द आहेत.अगदी पेन आणि पेन्सिलपासून ते टेबल आणि बेडशिटपर्यंत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आपण दिवसात कित्येकदा करतो.
मात्र, तो इंग्रजीमध्येच. यासाठीचे मराठी शब्द आपल्याला माहितीही नसतात.असाच एक शब्द म्हणजे हेल्मेट. आपल्यापैकी बहुतेक लोक दुचाकीने किंवा सायकलवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर करतात. हे हेल्मेट रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला सुरक्षा देतं.रस्त्यावर एखादी दुर्घटना घडल्यास काही गंभीर दुखापतीपासून हेल्मेट बचाव करू शकतं. दुचाकीच्या अपघातांचं प्रमाण कायमच वाढताना दिसतं.
अशात अपघात झाल्यास थेट मेंदूला इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट खूप महत्त्वाचं आहे.
मेंदूला इजा होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्या वाहनचालकांची संख्या 90 टक्के आहे. म्हणूनच अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये यासाठी हेल्मेट घालणं आवश्यक आहे.
हेल्मेट घालण्याचा सल्ला तर अनेकदा आपल्याला दिला जातो. मात्र या हेल्मेटला मराठीमध्ये काय म्हणतात? असं जर विचारलं, तर अनेकांना याचं उत्तर देता येणार नाही.बहुतेक लोक दररोज हेल्मेटचा वापर करतात. तर, हल्मेटला मराठीत शिरस्त्राण असं म्हणतात. म्हणजेच डोकं सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जाणारा संरक्षक टोप किंवा शिरोकवच.






