News
भारताच्या नकाशात श्रीलंका देश का दाखवला जातो? 99 टक्के लोकांना माहीतच नाही
भारताच्या नकाशात श्रीलंका देश का दाखवला जातो? 99 टक्के लोकांना माहीतच नाही

- भारताचा सुंदर नकाशा तुम्ही नेहमीच पाहिला असेल. शाळेत तर हा नकाशा भिंतीवर टांगलेला सतत तुमच्या डोळ्यांसमोर दिसला असेल.
- भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या आपल्या भारत देशात वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती, कला आणि वेशभूषा बघायला मिळतात.
- भारतासारखा असा विविधरंगी देश जगात कुठेही नाही. भारताच्या समुद्र सीमेबाबत सांगायचं तर समुद्र सिमेची एकूण लांबी 7516.6 किलोमीटरची आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, हवेली आणि दमन द्वीप, लक्षद्वीप, पॉडेंचेरी, अंदमान आणि निकोबार द्वीप इथे समुद्र किनारे आहेत.
- भारताचा नकाशा बघत असताना तुम्हाला दिसलं असेल की, त्यात सगळ्यात खाली छोटासा श्रीलंका देश सुद्धा दाखवला जातो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की, भारताच्या नकाशात श्रीलंका का दाखवला जातो? आज याचं प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
- जगात असे अनेक देश आहेत, ज्यांना समुद्र किनारे लाभले आहेत. अशात 1956 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून Convention of the law of the Sea चं आयोजन करण्यात आलं होतं. या सम्मेलनात वेगवेगळ्या देशांच्या समुद्र सीमा आणि त्यांच्यासंबंधी करार आणि कायद्यांची चर्चा करण्यात आली.
- समुद्री सीमांबाबत वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले. 1982 पर्यंत यासाठी तीन वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं. या बैठकांमध्ये समुद्री सीमेबाबत वेगवेगळे कायदे बनवण्यात आले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्याची प्रक्रिया झाली.देशांच्या समुद्री सीमेबाबत वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले, ज्यात लॉ ऑफ सी सुद्धा बनवण्यात आला.
- ज्यात सांगण्यात आलं आहे की, कोणत्याही देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेसलाइनपासून 200 नॉटिकल मैल म्हणजे 370.4 किलोमीटर सीमा दाखवणं बंधनकारक आहे. म्हणजे भारताला लागून असलेल्या 370.4 किलोमीटर समुद्राला भारताची समुद्र सीमा मानलं जाईल.
- भारतातील शेवटचं गाव म्हणजे धनुषकोडी ते श्रीलंकेच्या अंतराबाबत सांगायचं तर हे अंतर 18 नॉटिकल मैल म्हणजे 33.33 किलोमीटर आहे. अशात समुद्री नियमानुसार, भारताला आपल्या नकाशात श्रीलंका दाखवणं बंधनकारक आहे. याच कारणामुळे आपल्याला भारताच्या नकाशात श्रीलंका दिसतो.




