News

कौटुंबिक भांडणात पत्नीने केला पतीचा खून | पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

कौटुंबिक भांडणात पत्नीने केला पतीचा खून | पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे पत्नीने पतीचा खून केल्याची घटना खळबळजनक घटना मंगळवारी (दिर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली. गोरेगाव पोलिसाती मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यातील जखमेवरून ही बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे आपल्यावर प्रकरण येऊ नये म्हणून पेट्रोल टाकून जळीत प्रकाराचा बनाव केला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आपण पत्नीविरुद्ध रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील कैलास गलंडे (४३) हे त्यांची पत्नी सुमित्रा गलंडे (४०) व दोन मुलांसह बाभूळगाव येथे राहतात. त्यांचा एक मुलगा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. सोमवारी (दि.२) रात्री कैलास व त्यांची पत्नी सुमित्रा यांच्यात वाद झाला होता किरकोळ कुरबुरीनंतर मंगळवारी (दि.३) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास वाद विकोपाला गेला. या वादात कैलास हे काठी घेऊन सुमित्राचे अंगावर गेले. मात्र, यावेळी सुमित्राने पती कैलास यांच्या हातातील काठी घेऊन पतीच्या डोक्यात मारली. काठी डोक्यात लागल्यामुळे कैलास यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आपल्या हातून पतीचा खून झाल्याचे लक्षात येताच सुमित्रा घाबरली. तिने घरासमोरील दुचाकी वाहनातील पेट्रोल तांब्यांमध्ये काढून कैलास यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले. त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत पेटवून घेतल्याचा बनाव केला. पण तो यशस्वी झाला नाही.

सदरील घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक आंबादास भुसारे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेंगुळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

डोक्यात मारहाणीच्या खुणा दिसल्याने पितळ उघडे

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. यावेळी पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता मयत कैलास यांच्या डोक्यात मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. पोलिसांनी या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शस्त्राने वार केला असावा, असे सांगितले. त्यावरून पोलिसांनी मयत कैलास यांच्या पत्नीनेच खून केल्याची शक्यता गृहीत धरून चौकशी सुरू केली. यामध्ये रात्री उशिरा मयत कैलास यांचा मुलगा गणेश गलंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात सुमित्रा गलंडे हिच्या विरुद्ध गु.र.नं. ११९/२०२५ कलम १०३(१), २३८ (अ) भा.न्या.स. नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button