सर्व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – अजित पवार
Will help all those affected by heavy rains – Ajit Pawar

कृषी खात्याने खूप चांगले काम केले आहे. मात्र, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. जसजसे प्रस्ताव येतील, त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल. अचानक पाऊस आल्यामुळे या सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत.
कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिलीशिवाजीनगर येथील साखर संकुल येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन-२०२५ चे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, राज्याच्या कृषी विभागात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ६० टक्के, तर देशातील इतर राज्यांच्या ४० टक्के तज्ज्ञ कंपन्या सहभागी झाल्या आहेत.पवार म्हणाले की, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची तक्रार केल्याशिवाय त्या आपल्याला कळणार नाहीत. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमध्ये अशा घटना उघडकीस आल्या आहेत. या सर्व घटनांचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत.






